समलैंगिकतेसंदर्भात कायदा काय आहे?

Wednesday, August 27, 2014

भारतीय दंडसहिता कलम ३७७ नुसार समलिंगी संबंधांना तर मान्यता नाहीच; पण मुखमैथुन, गुदमैथुन त्याचप्रमाणे हस्तमैथुन करणे याला कायद्याची मान्यता नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. अशा प्रकारे संबंध करणार्‍या व्यक्तींना जन्मठेप अथवा काही वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. या कायद्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या समान अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य या कलमांचे उल्लंघन होते, असा आग्रह धरून या कायद्यात कालोचित बदल करण्याच्या मागणीसाठी काही सामाजिक संस्थांनी मिळून हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे. समलैंगिक संबंध असणार्‍या आणि ज्यांचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी समलिंगी आहेत अशा व्यक्तींनी लक्षात घ्यावेत, असे काही मुद्दे - - समलैंगिकतेसंदर्भात शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक पैलूंचा विचार करणे महत्त्वाचे आहे. समलिंगी व्यक्तीला त्याच्या स्वप्रतिमेबद्दल हजारो प्रश्न निर्माण होतात. आपण जसे आहोत तसे स्वीकारले जाणार नाही, अशी भावना बळावते आणि समलिंगी व्यक्ती अनेकदा समाज आणि कुटुंबीयांच्या दबावाखाली लग्न करायला तयार होते. परिणामत लग्नानंतर जोडीदाराशी शारीरसंबंधांमध्ये अडचण तर येतेच; पण त्याचबरोबर संसार निभावून नेणेही कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत अडकलेले काही जण घटस्फोट घेतात, तर काही घटस्फोटाचे कारण समाजाला कळले तर, या भीतीपोटी नाती आणि संसार रेटत राहतात. यात फरफट फक्त समलिंगी व्यक्तीची होते असं नाही, तर त्याच्या जोडीदाराचीही होते. - मानसिक, भावनिक व कौटुंबिक तसेच सामाजिक हे सर्व पैलू एकमेकांशी निगडित आहेत. ज्यावेळी आपल्याला आपल्या स्वतच्या लैंगिकतेची ओळख होते, त्यानंतर स्वतला नाकारण्यात काहीच अर्थ असत नाही. - व्यक्तीला स्वतला स्वीकारणं जसं अवघड जातं, तसंच समलिंगी कल असणार्‍या व्यक्तीचा स्वीकार करणं तिच्या कुटुंबालासुद्धा अवघड जातं. कित्येकदा अशा व्यक्तीचा कुटुंबामध्ये स्वीकार केला जात नाही. कुटुंबातील नातेसंबंध यामुळे बिघडतात, समाजामध्ये मानहानीला बळी पडावे लागते. समलिंगी आहे म्हणून ब्लॅकमेल केले जाते, लुबाडले जाते व जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते, अन्याय, अत्याचारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुटुंबीयांनी अशा व्यक्तीस नाकारू नये. अपमानाने वागवू नये.
-oksygen (lokmat)

No comments:

Post a Comment

 

Popular Posts